Engineering  |  M.B.A  |  Polytechnic

मिनिस्ट्री ऑफ फिशरीज गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांची डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसला भेट…….

तळसंदे  येथील डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस मधील रिसर्च सेंटरला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय विभागाचे टेक्निकल तज्ञ मोहसीन शेख त्याचबरोबर या विभागातील काही तज्ञ मंडळी यांनी भेट दिली.
महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर सुद्धा दुष्काळी पठ्ठा त्याचबरोबर क्षारपड जमिनीमध्ये बायोफ्लॉग फिश फार्मिंग खूप जोमाने सुरू आहे. शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवून देणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी आपले उत्पादन चांगल्या पद्धतीने करून आपला माल देशाबरोबरच इतर देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करत आहे.
परंतु प्रत्येक व्यवसाय मध्ये त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ची गरज भासत असते. या विभागातील कार्यरत असलेले तज्ञ मंडळी यांनी या रिसर्च सेंटर ला भेट देऊन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचबरोबर हा व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर करून देण्यासाठी नवनवीन रिसर्च व डेव्हलपमेंट याची गरज असल्याचे सांगितले व त्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस रिसर्च सेंटर च्या वतीने डॉ सतीश पावसकर यांनी विभाग प्रमुख प्राध्यापक शेख यांनी हे विभागातील अधिकारी व शेतकरी यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ची जोड देऊन कॉस्ट इफेक्टिव इक्विपमेंट्स तयार करून देण्याची हमी दिली.
यावेळी प्रा शेख यांच्यासोबत सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्थ आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्थ श्री पृथ्वीराज संजय पाटील,डी वाय पाटील ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळ : महाराष्ट्र राज्याचे मिनिस्ट्री ऑफ फिशरीज विभागाचे मोहसीन शेख याचे स्वागत करताना डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस चे डायरेक्टर डॉ सतीश आर पावसकर , प्रा शेख , रजिस्ट्रार प्रकाश भागाजे , डीन एस आर पवार व इतर