Engineering  |  M.B.A  |  Polytechnic

डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये शनिवारी मोफत सीईटी सराव चाचणीचे आयोजन….

डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये शनिवारी मोफत सीईटी सराव चाचणीचे आयोजन; विजेत्यांना मिळणार अभियांत्रिकी प्रवेश शुल्कात सवलत.

तळसंदे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात एमएचटी-सीईटीच्या तयारीसाठी डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्यावतीने शनिवार दि. ६ मे रोजी मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेतील विजेत्याना महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेताना सवलत दिली जाणार असल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी दिली.
 एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यापूर्वी त्याचा विध्यार्थ्यांना सराव व्हावा, परीक्षेबद्दलचे दडपण कमी व्हावे यासाठी डी. वाय पाटील टेक्निकल कॅम्पसच्यावतीने दरवर्षी सराव परीक्षेचे आयोजन केले जाते. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून घडणाऱ्या चुका निदर्शनास आणून त्यांचे मनोबल वाढविण्यास मदत होते.
हि लिंक वापरून आपण परीक्षा देऊ शकता.
 महाराष्ट्रामध्ये एमएचटी-सीईटी -२०२३ परीक्षा येत्या ९ मे पासून चालू होत आहेत. या परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांना वेळेच्या नियोजनाचे धडे देण्यासाठी सराव चाचणी परीक्षा अत्यंत महत्वाची ठरते. यापूर्वी शेकडो विद्यार्थ्याना या सराव चाचणी परीक्षेचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे अभियंता होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या जास्तीस जास्त विद्यार्थ्यानी या मोफत चाचणी परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीईटी सराव चाचणीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पावसकर यांनी केले. अधिक माहितीसाठी एम. एस. बिजली-८३२९७९८८९०, के. के. सहस्त्रबुद्धे-८२०८६३९३५२, के. एस. रेडेकर- ८८०५००७२७२ यांच्याशी संपर्क साधावा.