Engineering  |  M.B.A  |  Polytechnic

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस मध्ये जागतिक महिला दिन साजरा

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस मध्ये विविध स्पर्धा आयोजित करून जागतिक महिला दिन साजरा

तळसंदे: येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस मध्ये आज दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक कोमल पवार यांनी केले, त्यांच्या सोबत सायबर सेल कोल्हापूर चे पोलीस अंमलदार अजय सावंत व पोलीस नाईक सुजाता शिंदे उपस्थित होत्या.. त्यावेळी कोमल पवार यांनी मुलींना सायबर क्राइम व त्यामध्ये मुलींनी घायवायची काळजी याची माहिती दिली.

यावेळी नियोजन राष्ट्रीय सेवा योजना व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये रांगोळी, मेहंदी, पोस्टर प्रेझेंटेशन झाल्या रांगोळी मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी मानसी जाधव ,आरती चव्हाण ,मेहंदी मध्ये साक्षी निकम नम्रता किरतसिंग तर पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये राधिका कुलकर्णी यांनी बक्षीस मिळवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा वाघमारे व प्रा. ऐश्वर्या संकपाळ यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मिताली गिलबिले , रा. से. यो. चे प्रा. केदार रेडकर , मंगोलिकार व व इतर विध्यार्थी व विध्यर्थिनी प्रतिनिधी यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील , विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील , विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता , कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतिश आर. पावसकर, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे, डीन अकॅडेमिक्स प्रा आर. एस. पोवार यांनी शुभेच्या दिल्या.